शहा महादेवनगरमध्ये नवरात्र उत्सवाचा उत्साह शिगेला
शहा, ता. इंदापूर : इंदापूर तालुक्यातील शहा महादेवनगर येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. देवीच्या आराधनेसह महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागामुळे उत्सवाला विशेष रंगत आली आहे. परिसरात आनंद, उत्साह आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नवरात्र उत्सव म्हणजे केवळ देवीची पूजा-अर्चा नव्हे, तर समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा, नाती जपणारा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे. हीच भावना जपत माजी पंचायत समिती सदस्य सतीश उर्फ गोटू पांढरे यांच्या माध्यमातून उत्सवात आबालवृद्धांच्या आनंदाला विशेष महत्त्व दिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासह प्रत्येकाला उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळावी, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे आणि सर्वांनी एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवावेत, ही उत्सवामागील भावना कौतुकास्पद आहे.
उत्सवाचे खरे मोठेपण भव्य सजावट किंवा रोषणाईत नसून, त्या उत्सवातून किती माणसांच्या मनात आनंद निर्माण होतो, यामध्ये असते. शहा महादेवनगर येथील नवरात्र उत्सवातून भक्तीबरोबरच आपुलकी, सामाजिक बांधिलकी आणि एकतेची भावना अधोरेखित होत आहे.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शहा महादेवनगरमध्ये भक्तीचा जागर आणि आनंदाचा उत्सव रंगला असून, या उपक्रमातून सामाजिक सलोखा आणि एकतेची परंपरा जपली जात आहे.
— लाईव्ह महान्यूज
How does this story make you feel?
Click an emoji to share your reaction without leaving a comment.
Start the conversation!
Be the first to share your thoughts on this story.