MARKET
DOW 38,677.36 0.13%
S&P 500 5,026.61 0.06%
NASDAQ 15,990.66 0.24%
BTC/USD $47,284.50 2.45%
ETH/USD $2,488.12 0.82%
SOL/USD $107.45 1.12%
NIFTY 50 21,782.50 0.31%
GOLD $2,024.10 0.15%
DOW 38,677.36 0.13%
S&P 500 5,026.61 0.06%
NASDAQ 15,990.66 0.24%
BTC/USD $47,284.50 2.45%
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त इंदापुरात आंतरराज्यीय पोलीस मोटारसायकल रॅलीचे उत्साहात स्वागत!

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त इंदापुरात आंतरराज्यीय पोलीस मोटारसायकल रॅलीचे उत्साहात स्वागत!

इंदापूर | प्रतिनिधी


भारताचे लोहपुरुष आणि देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आंतरराज्यीय पोलीस मोटारसायकल रॅलीचे इंदापूर शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर वनगळी येथील एस. बी. पाटील शैक्षणिक संकुलात विद्यार्थिनींनी रॅलीतील पोलीस अधिकारी व अंमलदारांचे स्वागत करत देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.


आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुदुच्चेरी तसेच अंदमान-निकोबार येथील पोलीस अधिकारी व अंमलदार या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’कडे जाणाऱ्या या रॅलीच्या माध्यमातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना अधोरेखित करण्यात येत आहे. विविध राज्यांतील पोलीस दलांमधील एकता, समन्वय, बंधुभाव आणि देशाप्रती असलेली निष्ठा हा या उपक्रमाचा मुख्य संदेश आहे.


विविध राज्यांतील पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग


या रॅलीमध्ये तेलंगणाचे पोलीस उपअधीक्षक एस. सुरेश, आंध्र प्रदेशचे पोलीस उपअधीक्षक पी. एन. डी. प्रसाद, तामिळनाडूचे पोलीस उपअधीक्षक सेल्वादुराई, पुदुच्चेरीचे पोलीस उपअधीक्षक रिनीश चंद्र आणि अंदमान-निकोबारचे पोलीस निरीक्षक विशाल यांच्यासह विविध पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले आहेत.


मान्यवरांच्या उपस्थितीत इंदापुरात स्वागत


इंदापूर शहरात रॅलीच्या स्वागतप्रसंगी नगराध्यक्ष भरत शहा, नगरसेवक अनिल पवार, मारकड कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक मारुती मारकड सर व कुस्तीपटू, अतुल शेटे पाटील, दादासाहेब पिसे आणि माजी नगरसेवक हरिदास हराळे उपस्थित होते.


यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे आणि महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचीही उपस्थिती होती.


तसेच पोलीस हवालदार पवन भोईटे, पोलीस हवालदार लखन साळवे आणि गोपनीय अंमलदार गणेश वाघमोडे यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.


वनगळीतील शैक्षणिक संकुलात विद्यार्थिनींकडून स्वागत


इंदापूर पोलीस ठाण्यात स्वागत झाल्यानंतर रॅलीचे वनगळी येथील एस. बी. पाटील शैक्षणिक संकुलात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींच्या सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण लाभले.


विविध राज्यांतील पोलीस दलांना एका धाग्यात बांधणाऱ्या या रॅलीमुळे राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि देशाप्रती असलेली एकनिष्ठता यांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकात्म भारताच्या विचारांना अभिवादन करणाऱ्या या उपक्रमातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला उजाळा मिळाला.

How does this story make you feel?

Click an emoji to share your reaction without leaving a comment.

0 readers reacted to this story

Related Stories

2

0 Comments

Start the conversation!

Be the first to share your thoughts on this story.

Leave a response