MARKET
DOW 38,677.36 0.13%
S&P 500 5,026.61 0.06%
NASDAQ 15,990.66 0.24%
BTC/USD $47,284.50 2.45%
ETH/USD $2,488.12 0.82%
SOL/USD $107.45 1.12%
NIFTY 50 21,782.50 0.31%
GOLD $2,024.10 0.15%
DOW 38,677.36 0.13%
S&P 500 5,026.61 0.06%
NASDAQ 15,990.66 0.24%
BTC/USD $47,284.50 2.45%
भीमा नदीत तातडीने पाणी सोडा; हर्षवर्धन पाटील यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

भीमा नदीत तातडीने पाणी सोडा; हर्षवर्धन पाटील यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

विखे पाटील यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित निर्णय घेण्याचे आदेश; इंदापूरसह शेजारील तालुक्यांतील पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर


इंदापूर | प्रतिनिधी | दि. २२ ऑक्टोबर २०२६


इंदापूर : भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने इंदापूरसह शेजारील तालुक्यांमधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) दूरध्वनीवरून चर्चा करून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली.


या चर्चेदरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी परिसरातील पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित निर्णय घेण्याचे आदेश दिले असून, या प्रश्नावर सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.


पुणे पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि उजनी धरणाचे अधीक्षक अभियंता सु. स. खांडेकर यांना भीमा नदीत पाणी सोडण्यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश जलसंपदा मंत्र्यांनी दिले आहेत.


अनेक दिवसांपासून भीमा नदीचे पात्र कोरडे असल्याने इंदापूर, माढा आणि माळशिरस तालुक्यांसह मंगळवेढा व पंढरपूर शहर परिसरातील सुमारे ४० नळ पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला असून, अनेक योजना पाण्याअभावी बंद पडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लाखो नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.


या परिस्थितीत उजनी धरणातून भीमा नदीपात्रात तातडीने पाणी सोडणे आवश्यक असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांच्या मागणीची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आल्याने नदीत पाणी सोडण्याबाबत आता प्रशासनाच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


लाईव्ह महान्यूज : संतोष निकम 

How does this story make you feel?

Click an emoji to share your reaction without leaving a comment.

0 readers reacted to this story

0 Comments

Start the conversation!

Be the first to share your thoughts on this story.

Leave a response